माजी सैनिकांना वसतिगृहात नोकरीची संधी
माजी सैनिकांना वसतिगृहात
नोकरीची संधी
अकोला,दि. ४: सैनिकी मुला-मुलींच्या
वसतिगृहात माजी सैनिक व दिवंगत सैनिकांच्या पत्नी यांना नोकरीची संधी आहे. त्यासाठी
दि. 6 जुलैपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.
माजी सैनिक,दिवंगत सैनिकाच्या
पत्नी या प्रवर्गातून वसतिगृहात चौकीदार या पदासाठी जागा भरावयाच्या आहेत. पद अशासकीय,
तात्पुरत्या स्वरुपाचे व एकत्रित मानधनावर आहे. वसतिगृह चौकीदार हे पद निवासी आहे.
इच्छुकांनी आपले अर्ज सैन्य सेवा पुस्तक, आधारपत्र, दोन छायाचित्रे आदी कागदपत्रासह
सादर करावा. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक (0724) 2433377 वर संपर्क
साधावा.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा