शासकीय वसतिगृहात ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ
शासकीय वसतिगृहात ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ
अकोला, दि. 17 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात
मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहे चालवली जातात. त्यात ऑनलाईन प्रवेशासाठी
मुदतवाढ देण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात इयत्ता
११ वी व इतर जागा रिक्त राहिल्यास बिगर व्यावसायिक प्रशिक्षण जसे बीए, बीकॉम, बीएस्सीसाठी
जागा भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया https://hmas.mahait.org
या लिंकवर सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण असल्यास ऑफलाईन अर्ज वसतिगृहात
स्वीकारून 7 दिवसाच्या आत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. त्यानुसार गुणवत्ता
व आरक्षणनिहाय मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
अकोल्याचा रहिवासी नसलेल्या परंतु अकोला मनपा हद्दीतील महाविद्यालयात
प्रवेश घेतलेल्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मुर्तिजापूर रोड, जुने
प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ, किर्तीनगर येथे अर्ज सादर करावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल एस. एस. लव्हाळे यांनी केले
आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा