सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश सुरू

 

सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश सुरू

अकोला दि. 8 : अकोला येथील सैनिकी मुलां- मुलींच्या वसतिगृहात आजी व माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी इयत्ता १० वी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.

प्रवेशाचे अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत. हे वसतिगृह सिव्हिल लाईन परिसरात आकाशवाणी चौकानजिक आहे. अकोला शहराबाहेर वास्तव्य करणाऱ्या ग्रामीण व इतर भागातील आजी व माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल. या संधीचा जास्तीत जास्त आजी, माजी सैनिकांच्या पाल्यांनी लाभ घ्यावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०७२४- २४५६०६२ आणि ०७२४-२४५०३८३ वर अथवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा