खेळाडू व सैनिक कुटुंबियांसाठी सैन्यभरती

 

खेळाडू व सैनिक कुटुंबियांसाठी सैन्यभरती

अकोला, दि. १५ : सैनिक, माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या कुटुंबियांसाठी ठिकठिकाणी सैन्यभरती मेळावे होत आहेत.

भारतीय सैन्य दलातील विविध रेजिमेंटमध्ये सैनिकांच्या मुलगा आणि भाऊ तसेच प्राविण्यधारक खेळाडू यांच्यासाठी युनिट हेडक्वार्टर कोट्यातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रक्रियेची सविस्तर माहिती तसेच भरतीच्या वेळेत आवश्यक कागदपत्रांची यादी www.joinindianarmy.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महार रेजिमेंट सेंटर, सागर (मध्यप्रदेश) येथे दि. 21 जुलै ते 26 जुलै दरम्यान, एमआयआरसी मेकॅनिकल इन्फ. सेंटर ॲन्ड स्कूल, अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथे दि. 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान मेळावा होणार आहे.

सिकंदराबाद (तेलंगणा) येथील एओसी सेंटर, आणि वन इएमई सेंटर येथे दि. 1 ऑगस्ट रोजी मेळावा होईल. मद्रास रेजिमेंट वेलिंग्टन (तामिळनाडू) येथे दि. 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान, आर्म्ड कॉर्प्स सेंटर, अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथे दि. 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान, तसेच कर्नाटकमधील बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्री येथे दि. 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान भरती होईल.

उत्तराखंडमधील लेन्सडाऊन येथे गढवाल रायफल्स येथे दि. 4 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान, कर्नाटकातील बेंगळुरू येथे पॅरा रेजिमेंट सेंटरमध्ये दि. 4 ऑगस्ट रोजी आणि एएससी सेंटर नॉर्थ येथे दि. 4 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान मेळावा होईल. उत्तरप्रदेशातील फैजाबाद येथी डोग्रा रेजिमेंट सेंटर येथे दि. 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान आणि प. बंगालमधील रूरकी येथे बेंगॉल इंजिनिअरिंग ग्रुप सेंटर येथे दि. 4 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबरदरम्यान भरती होईल.

नवी दिल्लीत राजपुताना रायफल्स रेजि. सेंटर येथे  दि. 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान, बेंगळुरू येथे सीएमपी सेंटर येथे दि. 4 ऑगस्ट रोजी, महाराष्ट्रातील खडकी येथे बीईजी सेंटर दि. 4 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान, उत्तरप्रदेशातील राजपूत रेजिमेंट सेंटर येथे दि. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान, जबलपूर येथील वन सिग्नल ट्रेनिंग सेंटर येथे दि. 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान मेळावा.

उत्तराखंडातील राणीखेत येथे कुमाँऊ रेजिमेंट येथे दि. 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान, महाराष्ट्रात कामठी येथे गार्ड रेजिमेंट येथे 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान मेळावा होणार आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा