अकोट तालुक्यातील १७ संस्था अवसायनात

 

अकोट तालुक्यातील १७ संस्था अवसायनात

 

अकोला, दि. १६ : अकोट येथील सहकारी संस्था सहायक निबंधकांच्या कार्यक्षेत्रातील १७ सहकारी संस्था अंतिमत:  अवसायनात ठरविण्यात आल्या आहेत.

अवसायकांची अंतिम सभा दि. २८ जुलै रोजी दु. १२ वा. सहायक निबंधकांच्या कार्यालयात होईल. हे कार्यालय अकोटमध्ये पोपटखेड रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आहे. सभेला संस्थेच्या संचालक मंडळाने संपूर्ण दस्तऐवजासह उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक निबंधक रोहिणी विटणकर यांनी केले आहे.

 

अवसायकांमध्ये अकोट येथील स्वामी समर्थ सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था, राजर्षी शाहू सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था, नरनाळा सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था, राष्ट्रपिता महात्मा गांधी सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था, कृषी समृद्धी सहकारी संस्था, श्री नागास्वामी औषधी व सुगंधी वनस्पती, मसाला पीके उत्पादक सहकारी संस्था, नागवेली अभिनव शेती सहकारी संस्था, गजानन गृहनिर्माण सहकारी संस्था, सिद्धीविनायक गृहतारण सह. संस्था, रामदेव गृहनिर्माण सह. संस्था, लक्ष्मीनारायण गृहतारण सह. संस्था, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सह. संस्था यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे, मुंडगाव येथील पीक संरक्षण सहकारी संस्था, माता लक्ष्मी अभिवन शेती विविध तंत्रज्ञान संगोपन व समृद्धी सहकारी संस्था, श्री दत्त ग्रामीण उद्योग सहकारी संस्था यांचा समावेश आहे. रौंदळा येथील स्वामी विवेकानंद व्यवसाय तंत्रज्ञान सेवा सह. संस्था, केळीवेळी येथील वनसंवर्धन सहकारी संस्था या संस्था समाविष्ट आहेत.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा