जिल्हाधिका-यांच्या हस्ते जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ ‘अमृत’तर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी विविध योजना - जिल्हाधिकारी अजित कुंभार
जिल्हाधिका-यांच्या
हस्ते जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ
‘अमृत’तर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक
दुर्बलांसाठी विविध योजना
-
जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. १८ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती
व प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे (अमृत) राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. पात्र व्यक्तींनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा,
असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ‘अमृत’च्या
जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
प्रबोधिनीचे विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर, जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी,
उपव्यवस्थापक ऋषिकेश विधाते, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते.
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही
स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था, महामंडळातर्फे योजनांचा लाभ मिळत नाही अशा आर्थिक दुर्बल
घटकांना अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यात उद्योजकांसाठी वैयक्तिक कर्ज
व्याज परतावा योजना व परशुराम गट कर्ज व्याज परतावा योजना राबवली जाते, अशी माहिती
श्री. वरणगावकर यांनी दिली.
प्रबोधिनीतर्फे रोजगारक्षम कौशल्य विकासासाठी
स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम, कृषी उत्पन्नाधारित उद्योग प्रशिक्षण,
शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा, ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण, रोजगार,
नोकरी सहाय्य, तसेच औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी तांत्रिक रोजगारक्षम प्रशिक्षण,
सी-डॅक माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय, उद्योग इन्क्युबेशन सेंटर, किशोर विकास उपक्रम
आदी राबवले जाते, अशी माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली.
००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा