जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

 

जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

अकोला,
 दि.  : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात आजपासून दि.  जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे.  जूनमधील पावसामुळे नदी, नाले व तळ्यांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाण्यात शिरण्याचे अनावश्यक धाडस करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील धरणात पावसाचे प्रमाण वाढल्यास कोणत्याही क्षणी विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे पूर्णाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वीज  पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्‍यात यावा. अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. या कालावधीत रस्त्याचे अंडरपास, नाल्या, खड्डे, सखल भाग किंवा पाणी साठते अशा जागेवर जाणे टाळावे. पूर आलेल्या पुलावरून जाऊ नये. जनावरांना झाडांना किंवा वीजेच्या तारेखाली बांधू नये. वीज चमकताना मोबाईल व वीज उपकरणे बंद ठेवावी. वाहन वीजेच्या खांबापासून दूर ठेवावे. वीज पडण्याची सूचना मिळविण्यासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

  ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा