मा. ॲड. धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती, जमाती आयोग यांचा अकोला जिल्हा दौरा

 

अकोलादि. 16 : मा. ॲड. धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य हे दि. 18 जुलै रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालीलप्रमाणे.

शुक्रवार दि. 18 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण व जिल्हा समाजकल्याण  अधिकारी, जि.प. अकोला यांच्यासोबत अनुसूचित जातीच्या संपूर्ण योजनेबाबत आढावा बैठक. दुपारी 1 ते 2.30 वाजता महिला व बालकल्याण, क्रीडा विभाग व कृषी अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक व कामाची पाहणी. दुपारी 2.30 ते 3 राखीव. दुपारी 3 ते 5 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्या अंतर्गत जल जीवन मिशन योजनेचा आढावा व कामाची पाहणी अकोला जिल्ह्यातील सर्व गटविकास, ग्रामसेवक व इंजिनियर यांचे सोबत दलित वस्ती रमाई घरकुल वस्ती योजनेचा आढावा कामाची पाहणी. सोयीनुसार अकोला येथून बायरोड कारने नागपूरकडे रवाना व  नागपूर येथे मुक्काम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा