अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजनेत जिल्ह्यासाठी १ कोटी ९० लाखांचे उद्दिष्ट

 

अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजनेत

जिल्ह्यासाठी १ कोटी ९० लाखांचे उद्दिष्ट

अकोला,दि. ८ : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजनेत चालू आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला एकूण १ कोटी ९० लाख रुपयांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मिलिंद धांडे यांनी केले आहे. अनुदान योजनेत विविध व्यवसायांसाठी ५० हजार रु.पर्यंत विविध बँकांचे अर्थसहाय्य मिळवून देण्यात येईल. त्यामध्ये २५ हजार रु. अनुदान देण्यात येईल.

त्याचप्रमाणे, बीजभांडवल योजनेत ५ लाख रु. पर्यंत विविध बँकांच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येईल. यामध्ये अनुदान जास्तीत जास्त ५० हजार रुपये व नियमानुसार बीजभांडवल देण्यात येणार आहे. तरी अनुसूचित जाती मधील पात्र नवबौद्ध जात प्रवर्गातील लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह कर्ज मागणी प्रस्ताव तापडियानगर येथील साठे इमारतीत असलेल्या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा