जिल्ह्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळाल्याबद्दल उद्योजकांकडून जिल्हाधिका-यांचा गौरव
जिल्ह्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळाल्याबद्दल
उद्योजकांकडून जिल्हाधिका-यांचा गौरव
अकोला, दि. १७ : एक जिल्हा एक उत्पादनमध्ये अकोला जिल्ह्याला राष्ट्रीय
पारितोषिक मिळाल्याबद्दल संघा क्लस्टर व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींतर्फे जिल्हाधिकारी
अजित कुंभार यांचा गौरव करण्यात आला.
संघा क्लस्टरचे प्रवर्तक कश्यप जगताप, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक
संतोष बनसोड, अकोला औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, सहउपाध्यक्ष कमलेश अग्रवाल,
सचिव विनीत बियाणी, प्रसन्न रत्नपारखी, अधिक्षक भगवंतराव अनवणे आदी उपस्थित होते. जिल्हाधिका-यांच्या
नियोजन व मार्गदर्शनाने पुरस्कार प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात
आली.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याने कॉटन बेल्स, कॉटन यार्न, कॉटन गारमेंट
या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील उद्याग घटकांना
विपणन, ब्रँडिंग, निर्यातवाढीसाठी याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा