कावड यात्रेनिमित्त शहर व जिल्ह्यातील वाहतूकीत बदल

 

 

कावड यात्रेनिमित्त शहर व

जिल्ह्यातील वाहतूकीत बदल

 

अकोला, दि. २४ : श्रावणातील कावड यात्रेनिमित्त सुरळीत वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अकोला- अकोट, अकोला- दर्यापूर राज्य महामार्गावरील, तसेच अकोला शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला.

 

आदेशानुसार, हा बदल पहिला सोमवार (२८ जुलै), दुसरा सोमवार (४ ऑगस्ट), तिसरा सोमवार (११ ऑगस्ट) या तीन सोमवारी अकोला शहरात प्रत्येक रविवारच्या (२७ जुलै, ३ ऑगस्ट व १० ऑगस्ट) रात्री ८ वा. पासून तिन्ही श्रावण सोमवारी रा. १२ पर्यंत लागू राहील व राज्य मार्गावर आदला दिवस- प्रत्येक रविवारच्या (२७ जुलै, ३ ऑगस्ट व १० ऑगस्ट) दु. २ वा. पासून ते श्रावण सोमवारी सायं. ७ वा. पर्यंत लागू राहील.

चौथ्या सोमवारनिमित्त अकोला शहरातील कावड मार्गावरील वाहतूक  दि. १७ ऑगस्ट रोजी रा. ८ पासून दि. १८ ऑगस्ट रोजी रा. १२ पर्यंत, तसेच राज्य मार्गावरील वाहतूक दि. १७ ऑगस्ट रोजी दु. १२ पासून दि. १८ ऑगस्ट रोजी रा. ८ वा. पर्यंत वळविण्यात येणार आहे.

अकोला- अकोट, अकोला- दर्यापूर

राज्य महामार्गावरील वाहतूक

अकोला बसस्थानकाकडून रेल्वेस्थानक, आपातापा चौक, गांधीग्राम मार्गे अकोटकडे जाणारी व येणारी सर्व वाहतूक अकोला बसस्थानक, अशोक वाटिका, वाशिम बायपास, शेगाव टी पॉईंट, गायगाव- निंबा फाटा, देवरी- अकोट अशी वळविण्यात येणार आहे.

अकोला बसस्थानकापासून म्हैसांग मार्गे दर्यापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक अकोला बसस्थानक, अग्रसेन चौक, दुर्गा चौक, जठारपेठेकडून मोठी उमरी, गुडधी- रेल्वे फाटक, आदिलाबाद मार्गे म्हैसांग मार्गे दर्यापूर अशी वळविण्यात येणार आहे.

अकोला शहरातील मिरवणूक मार्गावरील वाहतूक

रेल्वे स्थानक चौकाकडून पुलावरून अकोट स्टँड ते कोतवाली चौक- लक्झरी बसस्थानक- वाशिम बायपासकडे जाणारी वाहतूक रेल्वेस्थानक चौकापासून अग्रसेन चौक, उड्डाण पुलावरून जेल चौक ते वाशिम बायपासकडे वळविण्यात येणार आहे.

अकोला नविन बसस्थानकाकडून गांधी चौक- कोतवाली चौक- जयहिंद चौकाकडून डाबकी रस्त्याकडे, तसेच पोळा चौक, हरिहरपेठेकडे जाणारी वाहतूक अशोक वाटिका चौक, जेल चौक, लक्झरी बसस्थानक, वाशिम बायपास, हरिहरपेठ, किल्ला चौक, भांडपुरा चौकातून डाबकी रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे.

डाबकी रस्त्याकडून विठ्ठल मंदिर, जयहिंद चौक, कोतवाली चौकाकडून गांधी रस्ता मार्गे बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक, तसेच डाबकी रस्त्याकडून भीमनगर चौक, दगडी पूल, मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक पोळा चौक, हरिहरपेठ, वाशिम बायपास, लक्झरी बसस्थानक, शासकीय उद्यान, अशोक वाटिका मार्गे बसस्थानकाकडे वळविण्यात येणार आहे.

लक्झरी बसस्थानकाकडून कोतवाली चौकातून टिळक रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक जेल चौक, नव्या उड्डाण पुलावरून अग्रसेन चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.

मूर्तिजापूर- दर्यापूर मार्गावरील वाहतूक  

मूर्तिजापूर ते दर्यापूर रस्त्यावरील टोल नाका, तसेच दर्यापूर ते मूर्तिजापूर टोल नाक्याकडे येणारी वाहतूक दर्यापूर रस्त्यावरील टोल नाका, मूर्तिजापूर, हिरपूर, बोरटा, आसरा फाटा, अमरावती रस्त्याने दर्यापूर अशी वळविण्यात येणार आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा