एल्‍डर हेल्पलाईन- ज्येष्ठांना आधार

 

एल्‍डर हेल्पलाईन- ज्येष्ठांना आधार

 

गेल्या काही दशकांमध्ये वृद्धांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. सध्या, देशामध्ये सुमारे १५ कोटी लोकसंख्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे, ही देशातील एकूण लोकसंख्ये पैकी टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विविध संशोधन, कागदपत्रांनुसार, ही संख्या २०५० पर्यंत साधारण कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.  ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे त्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सेवांचे नवीन मॉडेल विकसित करणे ही तितकेच आवश्यक होते.

 

याचकरिता सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन; एल्डरलाईन- १४५६७, सर्व राज्यांत व केंद्र शासित प्रदेशात सुरु करण्यात आली आहे. सदर हेल्पलाईन राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विध्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये चालविण्यात येत आहे.  

 

या राष्ट्रीय हेल्पलाइन चा उददेश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यात एल्डर लाईन १४५६७ ही सेवा ऑगस्ट २०२१ पासून राबवली जात आहे.

 

जेष्ठ नागरीकांच्या विविध समस्येबाबत व हेल्पलाईन माहिती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी हेल्पलाईनची कार्यप्रणाली हि संपूर्ण भारतात एकाच पद्धतीने कार्यरत आहे. या मध्ये कनेक्ट सेंटर व फिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध स्वयंसेवी संस्था, कायदेविषयक सल्लागार, समुपदेशक, स्वयंसेवक आदींच्या सहभागातून मदतीने कार्यरत आहे.

 

हेल्पलाईनशी संबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती  : एल्डर लाईन साठी १४५६७ हा क्रमांक टोल-फ्री आहे. एल्डर लाईन चे कार्य आठवड्याचे सर्व दिवस (म्हणजेच रविवार ते शनिवार) सकाळी ८.०० ते संध्याकाळी ८.०० चालते. संपूर्ण वर्षातील ३६२ दिवस सुरू असते (फक्त २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर रोजी सुट्टी असते)

 

एल्डर लाईन द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा:

·      माहिती देणे : आरोग्य विषयक जागरूकता, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण, सांस्कृतिक, कला, ज्येष्ठां संबंधी अनुकूल उत्पादने, आणि मनोरंजनाशी संबंधित माहिती.

·      मार्गदर्शन: कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.), आर्थिक, पेन्शन संबंधित सल्ला, आणि सरकारी योजनांची माहिती.

·      भावनिक समर्थन: चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित भीती निवारण, जीवन व्यवस्थापन, (वेळ, ताण, राग व्यवस्थापन) मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण (मृत्युपत्र बनवण्याचे महत्व इ.).

·      क्षेत्रीय पातळीवर मदत: विविध सरकारी यंत्रणा, भागधारक, स्वयंसेवक, सामाजिक संस्था यांचे मदतीने बेघर वृद्ध, अत्याचारग्रस्त ज्येष्ठ नागरिक, किंवा हरवलेल्या व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न व त्यांना परिवाराशी पुनर्मिलन करणे साठी कार्य करणे.

 

एल्डर लाईन या राष्ट्रीय हेल्पलाइन ची ध्येय, धोरणे आणि उद्दिष्ठे:

 

ध्येय: भारतातील ज्येष्ठ नागरिकांची सहानुभूतीपूर्वक सेवा करून सुखी आणि निरोगी जीवन वृद्धींगत करण्यासाठी.

 

धोरण: विविध सरकारी विभाग, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, अशा अनेक वचनबद्ध भागीदारांच्या सहभागातून आवश्यक ती माहिती आणि सहकार्य करून, भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे  होय.

 

उद्दिष्ठे:

१)    मार्गदर्शन आणि सहकार्य देण्यासाठी देशातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोहोचणे.

२)    ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासकीय योजना व कार्यक्रमांची माहिती प्रसारीत करणे व त्यांच्या अंमलबजावणीशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे.

३)    ज्येष्ठ नागरिकांना तक्रार निवारण यंत्रणा पुरविणे.

४)    ज्येष्ठ नागरिकांमध्ये आशा आणि विश्वास निर्माण करणे आणि त्यांचा वृद्धापकाळ आनंददायी करणे.

५)   ज्येष्ठ नागरिकांच्या विविध आवश्यकता समजून घेण्यासाठी आणि आवश्यक धोरणे आणि अंमलबजावणीची यंत्रणा तयार करणे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा