बाल विवाह टाळा ! कायद्याची अंमलबजावणी करा - डॉ बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला.



 बाल विवाह टाळा ! कायद्याची अंमलबजावणी करा - डॉ बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला.

                        २६ वा जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलै २०२५ रोजी अकोला जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला .अनिता मेश्राम मुख्य कार्यकारी अधिकारी व डॉ कमलेश भंडारी उपसंचालक आरोग्य सेवा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला व डॉ तरंगतुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नियोजन करून जिल्ह्यात जागतीक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.
            या कार्यक्रमाचे निमित्ताने शाळा, महाविद्यालये ,रुग्णालये तसेच गाव पातळीवर आरोग्य सेवा सत्राचे ठिकाणी, गट सभेच्या माध्यमातून विद्यार्थी ,शिक्षक ,ग्रामस्थांना एकत्रीत करून लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम, उदभवत असलेल्या समस्या, लोकसंख्या नियंत्रणासाठी चे उपाययोजना, संतती प्रतिबंधासाठी चे साधन उपलब्धता त्याचे फायदे वापर शासकीय आरोग्य संस्थेत याबाबत असलेल्या योजना जसे की पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया केल्यानंतर १४५० रु लाभार्थी ना मिळतात, शस्त्रक्रिये करीता वाहन व्यवस्था ईतर सर्व साधनांबाबत माहिती देण्यात आली विद्यार्थी रॅली काढून घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.वृत्तपत्र लेख, मोबाईल सोशल मीडिया वापर करून जनजागृती करण्यात आली. याकरिता लोक प्रतिनिधी ना सहभागी करून त्यांचे माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले
          याकरिता जिल्ह्यातील सर्व आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम राबविण्यात आले.
 या वर्षी (२०२५) चे जागतिक लोकसंख्या दिनाचे घोषवाक्य  आई होण्याचे योग्य वय तेंव्हा  शरीर व मनाची तयारी जेंव्हा
आहे याचा अर्थ प्रमाणे बाल विवाह टाळा योग्य वयातच मुलीचे १८वर्षे व मुलाचे २१ वर्षे नंतर लग्न करा कायद्याची अंमलबजावणी करा असा संदेश डॉ बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिला.
--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा