जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेसाठी संघटनांनी प्रमाणपत्र देणे आवश्यक जिल्हा क्रीडा अधिका-यांचे आवाहन
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेसाठी
संघटनांनी प्रमाणपत्र देणे आवश्यक
जिल्हा क्रीडा अधिका-यांचे आवाहन
अकोला, दि. ९ : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून,
त्यासाठी एकविध खेळ संघटनांचे राज्य संघटना संलग्नता प्रमाणपत्र व जिल्हा संघटना नोंदणी
प्रमाणपत्र आवश्यक आहे. संबंधित संघटनांनी ते दि. १४ जुलैपूर्वी सादर करण्याचे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.
या स्पर्धांमध्ये सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल, फुटबॉल, जलतरण व वॉटर
पोलो, मल्लखांब, बुध्दिबळ, हॅन्डबॉल, टेबल-टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, वेटलिफ्टींग, धनुर्विद्या,
तलवारबाजी, शुटिंगबॉल, नेहरु कप हॉकी, शालेय हॉकी, व्हॉलीबॉल, सॉफ्टबॉल, ज्युदो, रग्बी,
बास्केटबॉल, कॅरम, कबड्डी, खो-खो, बॉक्सींग, क्रिकेट, मैदानी, बॉल बॅडमिंटन, लॉनटेनिस
सायकलींग, जिम्नॅस्टीक, स्क्वॅश, योगासन, बेसबॉल, सॉफ्टटेनिस, रायफल शुटिंग, आट्यापाट्या,
रोलर स्केटींग, नेटबॉल, वूशु, रोलबॉल, थ्रोबॉल, डॉजबॉल, सिकई मार्शल आर्ट, टेनिक्वाईट,
मॉर्डन पॅन्टेथलॉन, सेपक टकरा, किक बॉक्सींग तायक्वांदो, कराटे यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे, आष्टे डू आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पिडबॉल, तेंगसुडो,
फिल्ड आर्चरी, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट, मिनी गोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग,
फ्लोअर बॉल, थायबॉक्सींग, हाफ किडो बॉक्सींग, रोप स्किपींग, सिलंबम, वुडबॉल, टेनिस
व्हॉलीबॉल, थांगता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टींग, बिच व्हॉलीबॉल,
टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुने डो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो,
युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंन्टाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट
डान्स, चॉकबॉल, शस्त्रांग मार्शल आर्ट (चॉयक्वांदो) फुटबॉल टेनिस, बुडो, म्युजिकल चेअर,
टेनिसबॉल क्रिकेट आदी सर्व खेळ समाविष्ट आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा