मानवाधिकार आयोगातर्फे लघुपट स्पर्धा जाहीर

 मानवाधिकार आयोगातर्फे

लघुपट स्पर्धा जाहीर

अकोला, दि. ११ :  राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे राष्ट्रीय लघुपट स्पर्धा 2025 जाहीर करण्यात आली आहे. त्यात पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे दोन लाख, दीड लाख व एक लाख रू. अशी भरघोस बक्षीसे जाहीर करण्यात आले आहेत.

 

त्याखेरीज ४ उल्लेखनीय कलाकृतींना ५० हजार रू. चे पारितोषिकही दिले जाणार आहे. रोख रकमेसह मानचिन्ह, प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.

लघुपट कुठल्याही भारतीय भाषेत इंग्रजी सबटायटल्ससह किंवा इंग्रजी भाषेत असावा. लघुपटाची लांबी ३ मिनीटांहून कमी आणि १० मिनीटांहून जास्त असू नये. लघुपटाचे शीर्षक, निर्माता, लेखक, दिग्दर्शक अशा श्रेयनामावलीचा लघुपटात समावेश असावा. प्रवेशिका दि. ३१ ऑगस्टपूर्वी गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून nhrcshortfilm@gmail.com या ई-पत्त्यावर पाठवावी. अर्जाचा विहित नमुना, आवश्यक कागदपत्रे व अधिक माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या संकेतस्थळावर मीडिया टॅबवर मिळू शकेल.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा