अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आर्थिक उन्नतीचे दार उघडणारे महामंडळ — मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

  

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आर्थिक उन्नतीचे दार उघडणारे महामंडळ — मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

 

आजच्या स्पर्धेच्या युगात चांगले शिक्षण हे केवळ गरजच नाही, तर यशाचे भक्कम पायाभूत साधन ठरले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून केवळ स्वतःचा विकास नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा विकास शक्य होतो. परंतु अनेकदा आर्थिक अडचणीमुळे हुशार विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आले आहे. आर्थिक दृष्ट्या मागासलेला अल्पसंख्यांकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना प्रशिक्षण योजना यामध्ये राबविल्या जातात त्यातच मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यामध्ये अल्पसंख्यांकांना विविध योजनांचा लाभ दिला जातो शैक्षणिक कर्ज, परदेशात शिक्षणासाठी कर्जाची योजना यामध्ये देण्यात येते.

शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना व मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेतून राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अल्पसंख्यांक मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी २८ सप्टेंबर २००० ला मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना मुंबई येथे करण्यात आली. या महामंडळाद्वारे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज, व्यवसाय ट्रेनिंग देणे समूहाच्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतपुरवठा योजना राबविणे अशा विविध योजना या महामंडळाद्वारे राबविल्या जातात. अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून ५ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज दिल्या जाते त्यामध्ये ३ टक्के व्याजदर असून, विद्यार्थ्यांच्या पालकांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे.

 

कोण आहे पात्र?

 

ही शिष्यवृत्ती मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या समाजांचा अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.

 

पात्र अभ्यासक्रम-

 

आयटीआय पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, नर्सिंग, फॅशन डिझायनिंग, टुरिझम, पत्रकारिता, मास मीडिया, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजेमेंट आदी अभ्यासक्रम यामध्ये देण्यात येतो. केंद्राच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून भारतातील शिक्षणासाठी रु. २० लाखापर्यंत तर परदेशातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रु. ३० लाखापर्यंत कर्ज ५ टक्के व्याजाने शैक्षणिक कर्ज मिळू शकते. त्याकरिता कौटुंबिक वार्षिक मर्यादा ही शहरी भागाकरिता १ लाख २० हजार पेक्षा कमीअसावे आणि ग्रामीण भागासाठी ९८ हजार वर्षील मर्यादा असणे आवश्यक आहे. या कर्जाची परतफेड शिक्षण झाल्यानंतर ६ महिन्यानंतर पुढील ५ वर्षात करता येईल. या योजनेचा लाभ घेण्याकरता विद्यार्थ्यांचे वय किमान १६ ते ३२ वर्ष असणे आवश्यक आहे. तर सदर योजनेचा लाभ घेता येईल.

 

आवश्यक कागदपत्रे -

आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, चालू वर्षाचे बोनाफाईड, फी स्ट्रक्चर(वर्षनिहाय), फी सवलत माहिती अर्ज, संपूर्ण पासपोर्टची छायांकित प्रत, विसाची छायांकित प्रत आदी कागदपत्रांची पूर्तता करून योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महामंडळाकडून कर्ज न घेतल्याचे प्रमाणपत्र द्यावे सदर करावे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ केवळ आर्थिक सहाय्य करणारी संस्था नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उभारी देणारी एक सामाजिक चळवळ आहे. योग्य मार्गदर्शन आणि योजनांचा लाभ घेतल्यास, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थीही उंच भरारी घेऊ शकतात आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देऊ शकतात.

(संकलन : सनी गवई, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी)

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा