इग्नूच्या ३५० अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत

 

इग्नूच्या ३५० अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत

 

नागपूर: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) विविध ३५० अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून, इच्छुक विद्यार्थ्यांना १५ जुलै २०२५ पर्यंत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहे.

नोकरी, व्यवसाय, घरकाम इत्यादीमुळे नियमित शिक्षणासाठी वेळ न देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इग्नूने मुक्त व दूरस्थ शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी आपल्या पात्रतेनुसार प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम निवडू शकतात.

यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, विद्यार्थी एकाच वेळी दोन अभ्यासक्रम (उदा. एक पदविका व एक पदवी) घेऊ शकतात. इग्नूचे स्वयं-अध्ययन साहित्य, अध्यायन पद्धती, तांत्रिक सुविधा, घरपोच साहित्य वितरण आणि विद्यार्थी सहाय्य सेवा यामुळे हे शिक्षण अधिक सुलभ होते.

अध्ययन केंद्रे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि नांदेड येथे उपलब्ध असून, विद्यार्थी आपापल्या सोयीप्रमाणे केंद्र निवडू शकतात. परीक्षा भारतातील कोणत्याही इग्नू परीक्षा केंद्रावर देता येते.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत आहे. ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे, अशा अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना बीए, बीकॉम, बीएससी अभ्यासक्रमात ५०% फी सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती इग्नू नागपूर केंद्राचे विभागीय संचालक डॉ. लक्ष्मण कुमारवाड यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा