महाऊर्जा वर्धापन दिन’ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उत्साहात साजरा

 









आज दि. 26 जुलै, 2025 रोजी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) चा ‘वर्धापन दिन’ श्री. अजित कुंभार (भा.प्र.से.), मा. जिल्हाधिकारी, अकोला यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे संपन्न झाला. यावेळी महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. विजय काळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. दिनोरे, महाऊर्जा अकोला येथील सर्व कर्मचारी व अकोला जिल्ह्यातील सोलर पुरवठादार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

महाराष्ट्र राज्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायो ऊर्जा इत्यादी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या विकासासाठी महाऊर्जा या स्वाय्यत मूलाधार शासकीय संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. राज्यामध्ये पी.एम. सुर्यघर (शासकीय इमारतींसाठी) व पी.एम. कुसुम (घटक-ब) अंतर्गत सौर पंप अशा विविध अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या विकासाचे बळकटीकरण करण्याची कामगीरी महाऊर्जा मार्फत करण्यात येत आहे. 

तेव्हा ‘महाऊर्जा वर्धापन दिन’ निर्मित्त मा. जिल्हाधिकारी (भा.प्र.से.) यांनी महाऊर्जास शुभेच्छा देवुन संबोधित केले. तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अधिका-अधीक अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांकडे वळावे, आणि जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ घेऊन सौर विद्युतीकरणाचा मार्ग अवलंबवावा असे आवाहन मा. जिल्हाधिकारी यांनी केले. तसेच प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे महाऊर्जा मार्फत आस्थापित होत असलेल्या 150 कि.वॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाची मा. जिल्हाधिकारी (भा.प्र.से.) यांनी पाहणी केली. व सौर प्रकल्प दि. 15 ऑगस्ट, 2025 पर्यंत कार्यान्वित करणेबाबत निर्देश दिले. तद्नंतर जिल्हा व्यवस्थापक, महाऊर्जा यांचे मार्फत उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन करुन कार्यक्रम संपन्न झाला.


०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा