जिल्हा परिषदेच्या उपकरातून अंमलबजावणी मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांगांसाठी विविध योजना

 

जिल्हा परिषदेच्या उपकरातून अंमलबजावणी

मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांगांसाठी विविध योजना

अकोला, दि. ३१ ; जि. प. उपकर योजनेतून मागासवर्गीय व्यक्तींसाठी, तसेच दिव्यांग कल्याण निधीतून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी दि. २१ ऑगस्टपूर्वी पंचायत समितीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जि. प. समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय लाभार्थ्यांना एचडीपीई पाईप पुरविणे, पिको मशिन पुरविणे, ताडपत्री पुरविणे, १०० टक्के अनुदानावर मागासवर्गीय शेतकरी लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक पंप (पाणबुडी) ५ एचपी संच पुरविणे, त्याचप्रमाणे, ९० टक्के अनुदानावर लघुउद्योग (छोटी डाळ गिरणी) पुरविणे, १०० टक्के अनुदानावर मागासवर्गीय महिलांना उद्योग उभारणीसाठी झेरॉक्स यंत्र पुरविणे आदी योजना राबविण्यात येत आहेत.

दिव्यांगांसाठी योजना

निराधार निराश्रीत व अतितीव्र दिव्यांगांना विनाअट निर्वाह भत्ता देण्यात एप्रिल २०२५ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रति लाभार्थी एक हजार रू. भत्ता देण्यात येणार आहे. दिव्यांगांच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर एलईडी वीजदिवे तयार करण्यासाठी अर्थसाह्य, दिव्यांगांच्या बचत गटांना झाडू व खराटा निर्माण करण्यासाठी किंवा उदबत्ती बनविण्यासाठी किंवा लाडू तयार करण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ९० टक्के अनुदानावर अर्थसाह्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, दिव्यांगांना जि. प. उपकर योजनेतून १०० टक्के अनुदानावर उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

गरजूंनी २१ ऑगस्टपूर्वी पंचायत समितीत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा