जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त १५ जुलैला विशेष ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

 

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त

१५ जुलैला विशेष ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

 

अकोला, दि.११: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त १५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी १० वा. विशेष प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज नोंदवून आपले शैक्षणिक कागदपत्रे, तसेच पासपोर्ट फोटोसह जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्रात उपस्थित राहून रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास अधिकारी प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

मेळाव्यात ‘इनोट्रो मल्टीसर्विसेस’मध्ये रिक्त १० पदे भरण्यात येतील. शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. ‘शोपन्झा सर्व्हिसेस’मधील २० रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.

भारतीय जीवन विमा महामंडळाच्या २५ पदे केवळ महिलांसाठी आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण आवश्यक आहे. ‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स’ येथील ५५ रिक्त पदांसाठी किमान १२ वी,  पदविका किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्यात ऑनलाइन सहभाग नोंदविण्यासाठी www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा