भोगवटदार वर्ग-२ च्या जमीनीवर तारण कर्ज नाकारल्यास कारवाई - जिल्हाधिकारी अजित कुंभार
भोगवटदार वर्ग-२ च्या जमीनीवर
तारण कर्ज नाकारल्यास कारवाई
-
जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला,दि. ८ : भोगवटदार वर्ग-२ ची शेतजमीन असलेल्या शेतक-यांना पीक
कर्ज, शेती विकसित करण्यासाठी आवश्यक मध्यम, दीर्घ मुदतीचे तारण कर्ज मिळण्यासाठी अडचण
येता कामा नये. दिरंगाई किंवा टाळाटाळ करणा-या बँकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा
इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बँकांना दिला आहे.
भोगवटदार वर्ग- २ च्या जमीनधारकांना बँका किंवा इतर वित्तीय संस्थांकडून
तारण कर्ज मिळण्याबाबत अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल
अधिनियम १९६६ च्या कलम ३६ (४), तसेच भारतीय स्टेट बँक किंवा बँक कंपन्याबाबत अधिनियम १९७० चे कलम २ अन्वय खंड (ड)च्या
अर्थानुसार भोगवटा वर्ग-२ जमीनधारक नवीन बँक
किंवा संबंधित कायद्यान्वये प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाकडून
कर्ज घेऊ शकतात.
त्यानुसार वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळविण्यासाठी जमीन गहाण ठेवायची
झाल्यास जिल्हाधिकारी किंवा शासनाच्या पूर्व परवानगीची गरज नाही. त्याचप्रमाणे, परतफेड
न झाल्यास उचित कार्यवाहीची मुभाही बँकांना देण्यात आली आहे. त्यामुळे शेतक-यांना पीक
कर्ज, तसेच शेती विकसित करण्यासाठी आवश्यक मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यास अडचण
आणू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा