विशेष लेख : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीला गती; कृषी पंपांना वीज; शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीची तजवीज

सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती होताना कार्बन उत्सर्जन होत नाही. सुदैवाने आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सौर ऊर्जेचा भक्कम पर्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात या योजने अंतर्गत सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी २१० एकर जमिनिचे अधिग्रहण करण्यात आले आहे. लवकरच या जमिनीवर सौर प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरूवात होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना १, अंतर्गत जिल्ह्यात बार्शिटाकळी तालुक्यात पिंपळखुटा येथे १.७५ मेगावॅट क्षमतेचा सौरप्रकल्प उभारून कार्यान्वितही करण्यात आला आहे.या अंमलबजावणीमुळे कृषीपंपांना दिवसाचे १२ तास वीज पुरवठा मिळणार असून साहजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीची तजवीज यातून होणार, हे नक्की. या योजनेत जास्तीत जास्त फीडर सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने भर हा शेतीसाठी वीज पुरवठ्यावर दिला जात आहे. या योजनेच्या कार्यान्वयनामुळे शेतीला दिवसा...