कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांकरीता शोध मोहिम राबवा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 



अकोला,दि.29(जिमाका)- निदान न झालेले कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांना त्वरीत बहुविधी औषधोपचार करा. तसेच जिल्ह्यातील नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविधी औषधोपचाराव्दारे संसर्गाची साखळी खंडीत करुन संसर्गाचा आटोक्यात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधिताना दिले.

            जिल्हाधिकारी यांच्या दालनात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण समिती आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, मनपाचे सहा.क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, वैद्यकीय अधिकारी एस.डी. बाबर आदि संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            जिल्हा समन्वय समिती सभेमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले की,  जिल्ह्यातील कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्याकरीता 1 जुलै 2021 ते 30 मार्च 2022 या कालावधीत शोध मोहिम कार्यक्रम यशस्वी व प्रभावीपणे राबवा. या करीता जिल्हा व ग्रामस्तरावरील आशा व पुरुष स्वयंसेवक व विविध स्तरावरील पर्यवेक्षकांना प्रशिक्षीत करा. प्रशिक्षीत पथकाव्दारे गृहभेटी देऊन रुग्णांचा कायमस्वरुपी रेकॉड तयार करावा. शोध मोहिमेकरीता सुक्ष्मकृती आराखड्यानुसार अभियानाचे नियोजन करुन जिल्ह्यातील अतिजोखमीच्या तालुक्यात सर्वेक्षण तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ