731 अहवाल प्राप्त, 15 पॉझिटीव्ह, 83 डिस्चार्ज

 


           अकोला,दि.20(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 731 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 716 अहवाल निगेटीव्ह तर 15  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 83 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 16  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57414(42971+14266+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 15+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 16 = एकूण पॉझिटीव्ह-31 

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 287448 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 283988  फेरतपासणीचे 396  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3064 नमुने होते. आजपर्यंत एकूण 287365 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  244394 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

15 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 15 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व  सात पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- बाळापूर-एक, तेल्हारा-एक, अकोट-तीन, मुर्तिजापूर-एक, अकोला मनपा क्षेत्र- नऊ.  दरम्यान काल (दि.19) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 16  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

83 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील पाच, हार्मोनी हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील एक,  थोटे हॉस्पीटल येथील तीन, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन,‍ के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, सोनोने हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 60 असे एकूण 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

879 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57414(42971+14266+177) आहे. त्यात 1118 मृत झाले आहेत. तर 55417 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 879  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ