रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 653 चाचण्यात नऊ पॉझिटीव्ह

 


अकोला,दि.15(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.14) दिवसभरात झालेल्या 977 चाचण्या झाल्या त्यात 34  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोला येथे 11 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोट येथे 57 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे 29 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बार्शीटाकळी येथे 20 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 24 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 165 चाचण्या झाल्या त्यात सहा जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला महानगरपालिका येथे 403 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 27 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, हेगडेवार लॅब येथे 26 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर पातूर येथे 184, अकोला आयएमए येथे 12, वैद्यकीय महाविद्यालय येथे 19 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 977 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 72 हजार 570 चाचण्या झाल्या पैकी 14236 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.  

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ