रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 430 चाचण्यात दोन पॉझिटीव्ह
अकोला,दि.21(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.20) दिवसभरात झालेल्या 430 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला येथे 29, तेल्हारा
येथे दोन, अकोला महानगरपालिका येथे 341,
अकोला आयएमए येथे आठ, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 12, वैद्यकीय महाविद्यालय येथे 29 चाचण्या झाल्या
त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 430 जणांच्या चाचण्या होऊन त्यात दोन जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 77 हजार 624 चाचण्या झाल्या पैकी 14328 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा