14 जिल्हा परीषद व 28 पंचायत समितीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर


अकोला दि. 22 जिमाका : जिल्‍हा परीषद व त्‍याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्‍यांमधील रिक्‍त झालेल्‍या पदांच्‍या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्‍हा परिषदमधील दानापुर, अडगांव बु., तळेगाव बु. अकोलाखेडा, कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड,कानशिवणी, अंदुरा, देगांव, दगडपारवा व शिर्ला या 14 निवडणूक विभागातील  व पंचायत समितीमधील हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, प्रिंप्री खु., अकोलखेड, मुंडगांव, रौंदळा, लाखपुरी, ब्रम्ही खु., माना, कानडी, दहिहंडा,घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगांव, निमकर्दा, पारस भाग-1, देगांव, वाडेगाव भाग-2, दगडपारवा, मोऱ्हळ, महान, पुनोती-बु, शिर्ला, खानापूर व आलेगांव या 28 निर्वाचक गणांकरिता पोटनिवडणुक घेण्‍यात येणार आहे.

पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केल्‍यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत संबंधीत मतदारसंघात आचारसंहिता अंमलात राहील. राज्‍य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूकीच्‍या तारखांची सुचना व निवडणूकीचा कार्यक्रम जिल्‍हाधिकारी मंगळवार दि. 29 जून रोजी प्रसिध्‍द करतील. या पोटनिवडणूकी करीता संकेत स्‍थळावर भरण्‍यात आलेले नामनिर्देशन पत्र निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्विकारण्‍याचा कालावधी हा मंगळवार दि. 29 जून ते सोमवार दि. 5 जुलै 2021 असुन सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यत स्विकारली जाणार आहेत. नामनिर्देशनपत्राची छाननी व त्‍यावर निर्णय देणे मंगळवार दि. 6 जुलै  रोजी सकाळी 11.00 वाजल्‍यापासून तसेच वैध उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा दि. 6 जुलै, नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्‍याबाबत किंवा ते नामंजूर करण्‍याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्‍या निर्णयाविरुध्‍द जिल्‍हा न्‍यायाधिशाकडे अपिल करण्‍याची शेवटची तारीख शुक्रवार दि. 9 जुलै 2021 राहील.  जिल्‍हा‍ न्‍या‍यधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्‍याची संभाव्‍य शेवटची तारीख सोमवार दिनांक 12 जुलै 2021 राहिल. जिल्‍हा न्‍यायाधिशांनी अपिल निकालात काढल्‍यावर वैध उमेदवारांची यादी सोमवार दिनांक 12 जुलै 2021 रोजी प्रसिध्‍द होईल.

उमेदवारी मागे घेणे अ.) जेथे अपिल नाही तेथे सोमवार दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत. ब.) जेथे अपिल आहे तेथे बुधवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेंपर्यत राहिल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करणे व निशाणी वाटप.  अ.) जेथे अपिल नाही तेथे सोमवार दिनांक 12 जुलै रोजी दुपारी साडेतीन नंतर,  ब.) जेथे अपिल आहे तेथे बुधवार दिनांक 14 जुलै रोजी दुपारी साडेतीन नंतर. मतदानाची तारीख सोमवार दिनांक 19 जुलै रोजी  सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यत राहील. मतमोजणी तारीख मंगळवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजेपासून व निवडून आलेल्‍या सदस्‍यांची शुक्रवार दि. 23 जुलै 2021 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ