741 अहवाल प्राप्त, 39 पॉझिटीव्ह,102 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू


           अकोला,दि.17(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 741 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 702 अहवाल निगेटीव्ह तर 39  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 102 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला,  तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.16) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 22  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57321(42920+14224+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 39+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 22 = एकूण पॉझिटीव्ह-61 

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 285328 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 281868 फेरतपासणीचे 396 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3064 नमुने होते. आजपर्यंत एकूण 285311 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 242391 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

39 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 39 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 18 महिला व 21 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापूर- चार, बार्शीटाकळी-तीन, बाळापूर-पाच, तेल्हारा-दोन, अकोट-आठ, अकोला-17. (अकोला ग्रामीण-सहा, अकोला मनपा क्षेत्र-11), दरम्यान काल (दि.16) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 22  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

102 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील एक, मातृभूमी हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, फतेमा हॉस्पीटल येथील पाच, डॉ. के.एस. पाटील हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, सोनोन हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 70 असे एकूण 102 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण हातोला ता. बार्शीटाकळी  येथील 73 वर्षीय पुरुष असून या रुग्णांस दि. 13 रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1056 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57321(42920+14224+177) आहे. त्यात 1117 मृत झाले आहेत. तर 55148 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1056  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ