1907 अहवाल प्राप्त, 133 पॉझिटीव्ह, 419 डिस्चार्ज, तीन मृत्यू
अकोला,दि.1(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1907
अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1774 अहवाल निगेटीव्ह तर 133 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 419 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर तीन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.31) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 59 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 55869(41970+13722+177)
झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 133 +
रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 59= एकूण पॉझिटीव्ह- 192.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 269922 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 266864 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2668 नमुने होते. आजपर्यंत एकूण 269868 अहवाल प्राप्त
झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 227898 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
133 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 133 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 61 महिला व 72 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-16, अकोट-13, बाळापूर-16, बार्शीटाकळी-
2, पातूर-12, तेल्हारा-2 अकोला-72.
(अकोला ग्रामीण-16, अकोला मनपा क्षेत्र-56), दरम्यान काल
(दि.31) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात
59 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात
आला आहे, याची
नोंद घ्यावी.
419 जणांना
डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 21, अकोला ॲक्सीडेंट येथील चार,
गोयंका गर्ल्स हास्टेल एक, ओझोन हॉस्पीटल
येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन,
लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील एक, तर होम
आयसोलेशन मधील 380 असे एकूण 419 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली.
तीन जणांचे मृत्यू
आज दिवसभरात तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,
काळेगाव ता. तेल्हारा येथील 50 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 30 मे रोजी दाखल झाले होते.
पिंपरी ता.अकोट येथील 82 वर्षीय पुरुष असून या रुग्णास
दि. 26 मे रोजी दाखल केले होते.
हिवखेड ता.तेल्हारा येथील 58 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 30 मे रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली.
4121 जणांवर
उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 55869(41970+13722+177) आहे. त्यात 1072 मृत झाले आहेत. तर 50676 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला असून सद्यस्थितीत 4121 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा