2172 अहवाल प्राप्त, 123 पॉझिटीव्ह, 419 डिस्चार्ज, आठ मृत्यू
अकोला,दि.3(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2172 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2049 अहवाल निगेटीव्ह तर 123 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 419 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर आठ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 58 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56239(42241+13821+177)
झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 123 +
रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 58= एकूण पॉझिटीव्ह- 181.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 273638 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 270572 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2676 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 273601 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 231360 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
123 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 123 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 50 महिला व 73 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-27, अकोट-पाच, बाळापूर-18, बार्शीटाकळी-
सात, पातूर-दोन, तेल्हारा-13 अकोला-51.
(अकोला ग्रामीण-सात, अकोला मनपा क्षेत्र-44), दरम्यान काल
(दि.2) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 58 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व
ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
419 जणांना
डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 11, आर्युवेदिक महाविद्यालय
येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील दोन, उशाई हॉस्पीटल येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील दोन, मातृभूमी हॉस्पीटल येथील
एक, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, सहारा
हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील सात, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील एक,
सन्मित्रा हॉस्पीटल येथील दोन, लोटस मल्टी.
हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 380 असे एकूण 419 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
आठ जणांचे मृत्यू
आज दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,
पंचगव्हाण ता. तेल्हारा येथील 62 वर्षीय
पुरुष असून या रुग्णास दि. 26 मे रोजी दाखल झाले होते.
उरळ ता. बाळापूर येथील 55 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 26 मे रोजी दाखल केले होते.
मलकापूर येथील 64 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 31 मे रोजी दाखल केले होते.
अकोट येथील 83 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 29 मे रोजी दाखल केले होते.
खानापूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 28 मे रोजी दाखल केले होते.
आनंद नगर येथील 65 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 31 मे रोजी दाखल केले होते.
शिवणी येथील 71 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 1 जून रोजी दाखल केले होते.
नागेवाडी, अकोला येथील 78 वर्षीय
पुरुष असून या रुग्णास दि. 25 मे रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली.
3648 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56239(42241+13821+177) आहे. त्यात 1088 मृत झाले आहेत. तर 51503 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला असून सद्यस्थितीत 3648 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा