1389 अहवाल प्राप्त, 93 पॉझिटीव्ह, 417 डिस्चार्ज, सात मृत्यू
अकोला,दि.4(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1389
अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1296 अहवाल निगेटीव्ह तर 93 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 417 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सात जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 59 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56391(42334+13880+177)
झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 93 +
रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 59= एकूण पॉझिटीव्ह- 152.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 275085 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 272017 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2678 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 274990 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 232656 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
93 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 93 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 34 महिला व 59 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-18, अकोट-एक, बाळापूर-आठ, बार्शीटाकळी-
चार, पातूर-तीन, तेल्हारा-आठ, अकोला-51. (अकोला ग्रामीण-14, अकोला मनपा
क्षेत्र-37), दरम्यान काल (दि.3) रात्री प्राप्त रॅपिड
ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 59 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व
ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
417 जणांना
डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 16, उपजिल्हा रुगणालय
मुर्तिजापूर येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, युनिक हॉस्पीटल
येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, पिकेव्ही
जम्बो हॉस्पीटल येथील एक, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, मातृभूमी हॉस्पीटल येथील एक,
आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल
येथील एक, बिहाडे
हॉस्पीटल येथील तीन, सोनोने हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील तीन,
सन्मित्रा हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल
स्कायलार्क येथील एक, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन
मधील 370 असे एकूण 417 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली.
सात जणांचे
मृत्यू
आज दिवसभरात सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,
अडोसी ता. बाळापूर येथील 95 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 1 जून रोजी दाखल झाले होते.
भातवाडी ता. बाळापूर येथील 65 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 2 रोजी दाखल केले होते.
मोठी उमरी येथील 38 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 27 मे रोजी दाखल केले होते.
पारस येथील 73 वर्षीय महिला असून या
महिलेस दि. 15 मे रोजी दाखल केले होते.
खडकी येथील 65 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 2 जून रोजी दाखल केले होते.
व्याळा येथील 43 वर्षीय महिला असून या
महिलेस दि. 30 मे रोजी दाखल केले होते.
माणिक टाँकीज येथील 68 वर्षीय तृतीयपंथी असून या
रुग्णास दि. 2 जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली.
3376 जणांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा