खरीप हंगामासाठी पाणी अर्ज मागविले

अकोला,दि. १६(जिमाका)- अकोला पाटबंधारे विभागां तर्गत  असलेल्या पाटबंधारे प्रकल्पावरुन  २०२१-२२ मध्ये जलाशयात उपलब्ध साठ्यानुसार  खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या जलसाठ्यातून ज्या  लाभधारकांना पाणी हवे असेल त्यांनी आपले पाणी अर्ज हे दि.१५ जुलै पर्यंत पाठवावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला  यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित शाखा कार्यालय वा उपविभाग कार्यालयाशी संपर्क करावा. पाणी मागणीचे कोरे नमुना अर्ज हे शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात मोफत उपलब्ध आहेत. पाणी मागणी करणारा शेतमालक असावा, कुळ अगर वहितदार असल्यास मागणी सोबत मालकाचे संमतिपत्र द्यावे. सर्वे नंबर व पोट हिस्स्यांची अचूक नोंद करावी, इ. सुचनाही कळविण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ