अकोला,दि.2(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.1) दिवसभरात
झालेल्या 1425 चाचण्या झाल्या त्यात 41 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट 120 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तेल्हारा येथे 62 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, मुर्तिजापूर येथे 55 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका येथे 968 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 67 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेगडेवार लॅब येथे 52 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला येथे 25,
बाळापूर येथे 13, पातूर येथे 36, अकोला आयएमए येथे पाच, आरोग्य
कर्मचाऱ्यांचे 22 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1425 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 41 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 58 हजार 682 चाचण्या झाल्या पैकी 13815 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले
आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा