748 अहवाल प्राप्त, 12 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज

            अकोला,दि.26(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 748 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 736 अहवाल निगेटीव्ह तर 12  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 14 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57556(43049+14330+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी  दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 12+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 15 = एकूण पॉझिटीव्ह-27

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २९१३२४ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २८७८४९  फेरतपासणीचे 396  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3079 नमुने होते. आजपर्यंत एकूण २९१३०२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 248253 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

12 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 12 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- अकोट-दोन, बाळापूर-पाच, पातूर-एक, अकोला मनपा क्षेत्र-चार, दरम्यान काल (दि.25) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 15  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

14 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक, हॉटेल इंद्रप्रस्थ येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन,  थोटे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील एक, बायस्कार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, लोटस मल्टी. हॉस्पीटल  येथील दोन, असे एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

426   जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57556(43049+14330+177) आहे. त्यात 1126  मृत झाले आहेत. तर 56004 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 426  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन