नोंदित घरेलू कामगारांची माहिती अद्यावत करण्यासाठी लिंक प्रसिद्ध

 


            अकोला, दि.२१ (जिमाका)- शासनाच्या निर्देशानुसार कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या काळात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदित नुतनीकरण केलेल्या पात्र घरेलू कामगारांना १५५ रुपयांचे आर्थिक सहाय्य वाटप करावयाचे आहे.  सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत  लाभ वाटपाबाबतची कार्यवाही सुरु आहे, त्यासाठी महामंडळाने कामगारांची माहिती ऑनलाईन पद्धतीने अद्यावत करता यावी यासाठी लिंक प्रसिद्ध केली आहे. त्यावर जाऊन कामगारांनी माहिती अद्यावत करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे. 

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदित घरेलू कामगारांपैकी सन २०११ ते २०१५ पर्यंत नोंदणी नुतनीकरण केलेल्या घरेलू कामगारांचा आवश्यक तो तपशिल ऑनलाईन संकलित केलेला नाही तसेच सन २०१५ ते २०२१ या कालावधीत नोंदणी नुतनीकरण केलेल्या ऱ्या घरेलू कामगारांचे बॅंक तपशिल अथवा इतर अनुषंगिक तपशिल हा पूर्ण आहे.

याकरिता सन २०११ ते ३१ मार्च २०२१ मधील नोंदित नुतनीकरण केलेल्या घरेलू कामगारांची माहिती अद्यावत करण्यासाठी https://public.mlwb.in/public ही लिंक मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे.

या लिंकवर जाऊन पुढील प्रमाणे वापर करावा-

१.      नोंदित घरेलू कामगारांनी त्यांची माहिती सादर करण्यासाठी http://public.mlwb.in/public या वेबसाईटवर जावे. वेबसाईट ओपन केल्यानंतर 'Domestic Workers Data Update' अशी लिंक लाल रंगामध्ये सर्वात वर दिसेल, त्यावर क्लिक करा. 

. त्यानंतर घरेलू कामगाराने या कार्यालयाद्वारे देण्यात आलेल्या नोंदणी नुतनीकरणाच्या पावतीवरिल नोंदणी

    क्रमांक (Registration No.), दिलेल्या बॉक्स मध्ये तो टाकून Search बटणावरती क्लिक करावे.

.त्यानंतर सदर प्रणाली घरेलू कामगारास त्यांची माहिती दिसेल.  चुकीची माहिती असल्यास दुरुस्त करा

    त्या फॉर्म मध्येच घरेलू कामगारांना काही कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे, ते अपलोड करावे.

.वरिल अर्ज भरल्यानंतर व कागदपत्र पुर्ण केल्यानंतर Submit या बटणावरती क्लिक करावे.

.जर घरेलू कामगाराला त्यांचा नोंदणी क्रमांक टाकून Search बटणवर  क्लिक केल्यानंतरही त्यांची माहिती

    दिसली नाहि तर, त्यांनी त्यांचा संपूर्ण तपशिल सादर करण्यासाठी  Yes  या बटणावरती क्लिक करावे.  एक 

    अर्ज ओपन होईल त्यामध्ये कामगारांनी त्यांचा संपुर्ण तपशिल भरुन घ्यावा अनुषंगिक कागदपत्रे त्यास

    जोडावे त्यानंतर Submit या बटणावरती क्लिक करावे.

            त्यानंतर घरेलू कामगाराचा तपशिल हा मंडळाच्या साईटवर प्राप्त होईल.  अशा पद्धतीने नोंदित घरेलू कामगारांनी त्यांचा अनुषंगिक तपशिल मंडळाने दिलेल्या लिंकवर सादर करावे जेणेकरुन सर्व नोंदित पात्र घरेलू कामगारांना अर्थसहाय्य देणे शक्य होईल, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ