109 अहवाल प्राप्त, पाच पॉझिटीव्ह, 144 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू


           अकोला,दि.14(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 109 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 104 अहवाल निगेटीव्ह तर पाच  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 144  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57160(42836+14147+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर पाच + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी नऊ= एकूण पॉझिटीव्ह- 14.

 

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 282952 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 279498 फेरतपासणीचे 396 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3058 नमुने होते. आजपर्यंत एकूण 282918 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 239978 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

पाच पॉझिटिव्ह

आज दिवसभरात पाच अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- बार्शीटाकळी-दोन व अकोला मनपा क्षेत्र-तीन, दरम्यान काल (दि.13) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात नऊ  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

144 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, युनिक हॉस्पीटल येथील एक, हार्मोनी हॉस्पीटल येथील दोन, उशाई हॉस्पीटल येथील एक, गोयंका गर्ल्स हॉस्टले येथील दोन, हॉटेल इंदप्रस्त येथील एकबिहाडे हॉस्पीटल येथील एकके. एस. पाटील हॉस्पीटल येथील  एक, आधार हॉस्पीटल येथील 14, सोनोने हॉस्पीटल येथील  एक, केअर हॉस्पीटल येथील  एक, बैस्कार हॉस्पीटल येथील  एक, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 110 असे एकूण 144 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

आज दिवसभरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली.  त्यात,

महागाव ता. बार्शीटाकळी येथील 42 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 2 जून रोजी दाखल केले होते.

अंबाडा ता. अकोट येथील 85 वर्षीय पुरुष  असून या रुग्णास दि. 1 जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1290 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57160(42836+14147+177) आहे. त्यात 1114 मृत झाले आहेत. तर 54756 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1290 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ