मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही - समाजमाध्यमांवरील माहितीवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन


अकोला, दि.30 (जिमाका)- समाजमाध्यमांमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) या योजनेसंदर्भात माहिती पसरविण्यात येत आहे. या संदेशात चुकीची माहिती देण्यात आली आहे. या माहितीवर कुणीही विश्वास ठेवू नये., तसेच या योजनेच्या कामासाठी  कोणत्याही खाजगी संस्थेची वा व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली नाही, तरी नागरिकांनी अशा माहितीपासून सावध रहावे, असे जिल्हा उद्योग केंद्र, अकोला मार्फत कळविण्यात आले आहे.

 CMEGP  या योजनेसंदर्भात काहीही काम असल्यास त्यासाठी नागरिकांनी व लाभार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, भुविकास बॅंक इमारत, पहिला मजला, एस. पी. ऑफिसच्या  बाजूला, अकोला (दूरध्वनी- ०७२४-२४३०८८०) येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र, अकोला यांनी केले आहे.

यासंदर्भातील महत्त्वाच्या योजना व त्यांची माहिती याप्रमाणे उपलब्ध होईल.

१)     प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP)- ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून उद्योग व सेवा उद्योगासाठी २५ लाख रुपये प्रकल्प किंमती येवढे कर्ज बॅंकांमार्फत मंजूर होऊ शकते. विविध प्रवर्गांसाठी  १५ ते ३५ टक्के अनुदानही मिळते. या योजनेची सर्व कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने  www.kviconline.gov.in या संकेतस्थळावरुन होते.

२)     मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP)- ही योजना राज्यपुरस्कृत असून उत्पादन उद्योगासाठी ५० लाख रुपये तर सेवा उद्योगासाठी  १० लाख रुपये कर्ज बॅंकेमार्फत उपलब्ध होऊ शकते. या योजनेतही विविध प्रवर्गानुसार  १५ ते २५ टक्के अनुदान मिळते. या योजनेसंदर्भात सर्व कार्यवाही  ऑनलाईन पद्धतीने  www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावरुन होते.

३)     सुधारित बीज भांडवल योजना - ही योजना राज्यपुरस्कृत जिल्हा उद्योग केंद्र व बॅक यांचेमार्फत ऑफलाईन पध्दतीने राबविल्या जाते. या योजनेअंतर्गत उद्योग, सेवा व व्यापार या प्रकारात व्यवसाय करण्याकरीता जास्तीत जास्त 25 लाख प्रकल्प किमंती ऐवढे कर्ज बॅकेमार्फत उपलब्ध होवू शकते. योजनेत सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारास एकूण मंजूर प्रकल्प किंमतीचे 15 टक्के व अनुसुचित जाती व जमातीचे प्रवर्गातील अर्जदारास रु. 10 लाख प्रकल्प किंमतीचे प्रकल्पाकरीता 20 टक्के व त्यावरील रक्कमेसाठी 15 टक्के बीज भांडवल कर्ज रक्कम वार्षिक सहा टक्के व्याज दराने जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत दिली जाईल.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ