रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 590 चाचण्यात 24 पॉझिटीव्ह

 


अकोला,दि.12(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.11) दिवसभरात झालेल्या 590 चाचण्या झाल्या त्यात 24  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोट येथे 235 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथील 34 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, पातूर येथील 27 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  मुर्तिजापूर येथे 112 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 43 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,  हेगडेवार लॅब येथे 18 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला येथे पाच, बाळापूर येथे 41, तेल्हारा येथे 31, अकोला आयएमए येथे 11, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 33 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 590 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 70 हजार 303 चाचण्या झाल्या पैकी 14174 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ