736 अहवाल प्राप्त, 13 पॉझिटीव्ह, 165 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

           अकोला,दि.22(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 736 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 723 अहवाल निगेटीव्ह तर 13  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 165 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 16 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57452(42991+14284+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 13+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 16 = एकूण पॉझिटीव्ह-29 

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 288347 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 284880  फेरतपासणीचे 396  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3071 नमुने होते. आजपर्यंत एकूण 288260 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 245269 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

13 पॉझिटिव्ह

  आज  दिवसभरात 13 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- तेल्हारा-एक, बाळापूर-सहा, अकोला-सहा. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-पाच), दरम्यान काल (दि.21) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात दोन  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

165 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील एक, लोटस मल्टी. हॉस्पीटल  येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 147 असे एकूण 165 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

आज दिवसभरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली.  त्यात गौरक्षण रोड, मलकापूर येथील 63 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 16 जून रोजी दाखल केले होते, तर शिवणी, अकोला येथील 35 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 21 जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

580 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57452(42991+14284+177) आहे. त्यात 1122 मृत झाले आहेत. तर 55750 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 580  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा