रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 712 चाचण्यात 16 पॉझिटीव्ह
अकोला,दि.22(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.21) दिवसभरात झालेल्या 712 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे आठ चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे 39 चाचण्या
झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 14 चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल
पॉझिटीव्ह आला,
अकोला महानगरपालिका येथे 379 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, हेगडेवार लॅब येथे 53 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला येथे चार, बार्शीटाकळी
येथे 22, पातूर येथे 46, मुर्तिजापूर येथे 99, अकोला आयएमए येथे सात, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 13, वैद्यकीय महाविद्यालय येथे 28 चाचण्या झाल्या
त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 712 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 16 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 77 हजार 624 चाचण्या झाल्या पैकी 14328 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा