159 अहवाल प्राप्त, सात पॉझिटीव्ह, 168 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू


           अकोला,दि.21(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 159 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 152 अहवाल निगेटीव्ह तर सात  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 159 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57423(42978+14268+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर सात+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी दोन = एकूण पॉझिटीव्ह-नऊ 

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 287536 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 284073  फेरतपासणीचे 396  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3067 नमुने होते. आजपर्यंत एकूण 287524 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  244546 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

सात पॉझिटिव्ह

  आज  दिवसभरात सात अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापूर-एक, तेल्हारा-तीन, अकोला-तीन. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-दोन), दरम्यान काल (दि.20) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात दोन  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

168 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील एकसमर्पण हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील तीन, फातेमा हॉस्पीटल येथील तीन, डॉ.के.एस.पाटील हॉस्पीटल येथील एक, काळे हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 150 असे एकूण 168 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

आज दिवसभरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली.  त्यात काडोसी पारस ता. बाळापूर येथील 65 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 14 जून रोजी दाखल केले होते, तर गाडेगाव ता.तेल्हारा येथील 55 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 14 जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

718 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57423(42978+14268+177) आहे. त्यात 1120 मृत झाले आहेत. तर 55585 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 718  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ