आंतरराष्ट्रीय योग दिनः विविध संस्था व व्यायामप्रेमींचा ऑनलाईन सहभाग

 


अकोला, दि.२१ (जिमाका)- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध संस्था व व्यायामप्रेमी नागरिकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवून आपापल्या घरी योगासने करुन सहभाग दिला.

याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने  दिलेल्या माहितीनुसार योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवा भावी संघटनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत  आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या वर्षी कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पद्धतीने योग दिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा कार्यालय येथे  सकाळी सात ते साडेआठ वाजता ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते  दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे वृक्षरोप देवून स्वागत करण्यात आले.  प्रास्ताविक जिल्हा क्रिडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले. पतंजली योग समितीचे सुहास काटे व दीपक जस्वानी यांनी योगासनांचे प्रात्यक्षीक सादर केले. त्यानंतर प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या अर्चना दीदी यांच्या मार्गदर्शनात ध्यान धारणा कार्यक्रम झाला. योग दिनाचे प्रबोधन भारत स्वाभिमान संघाचे सारीका तिवारी यांनी केले. सुत्रसंचालन बालाजी सानप व समारोप जिल्हा क्रीडा कार्यालयाचे लक्ष्मीशंकर यादव यांनी केले.  या आयोजनाकरीता जिल्हा क्रीडा कार्यालयातील मनिषा ठाकरे, सतिषचंद्र भट, राजू उगवेकर, निशांत वानखडे, विक्रम काळे, अजिंक्य धेवडेक, गजानन चाटसे, अनिल डेंगाळे गंगाधर झरे यांनी परिश्रम घेतले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ