सार्वजनिक वितरण व्यवस्था: जुलै महिन्यासाठी वाटप परिमाणे निश्चित
अकोला,दि.21 (जिमाका)- जिल्ह्याकरिता माहे जुलै-2021 करिता लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य/नियंत्रित साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तुचे वाटप परिमाणे खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा
अधिकारी बी.यु.काळे यांनी दिली आहे.
अ.क्र. |
धान्याचा प्रकार |
वाटप परिमाण |
धान्य वाटपाचे किरकोळ दर |
1 |
प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु |
तीन किलो प्रति व्यक्ती |
प्रति किलो दोन रुपये |
2 |
प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ |
दोन किलो प्रति व्यक्ती |
प्रति किलो तीन रुपये |
3 |
अंत्योदय अन्न योजना गहू |
15 किलो प्रति
कार्ड |
प्रति किलो दोन रुपये |
4 |
अंत्योदय अन्न योजना तांदुळ |
20 किलो प्रति कार्ड |
प्रति किलो तीन रुपये |
5 |
एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता गहु |
चार किलो प्रति व्यक्ती |
प्रति किलो दोन रुपये |
6 |
एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता तांदुळ |
एक किलो प्रति व्यक्ती |
प्रति किलो तीन रुपये |
7 |
नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्याकरिता |
एक किलो प्रति शिधापत्रिका (साठा उपलब्धतेनुसार ) |
प्रति किलो 20 रुपये |
त्यानुसार वाटप परिमाण खालीप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. वरील वाटप परिमाण गोदामातील साठयाचे व लाभार्थी संख्याचे उपलब्धतेनुसार राहील,असेही जिल्हा पुरवठा विभागाने कळविले
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा