678 अहवाल प्राप्त, 19 पॉझिटीव्ह,92 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

   अकोला,दि.18(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 678 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 659 अहवाल निगेटीव्ह तर 19  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले.  दरम्यान 92 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला,  तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 16  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57356(42939+14240+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 19+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 16 = एकूण पॉझिटीव्ह-35 

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 286054 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 282594 फेरतपासणीचे 396 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3064 नमुने होते. आजपर्यंत एकूण 285989 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 243050 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

19 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 19 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- बार्शीटाकळी-पाच, तेल्हारा-एक, अकोट-सहा, अकोला-सात. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-सहा)दरम्यान काल (दि.17) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 16  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

92 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, थोटे हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील एक,‍ इंदिरा हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, तर होम आयसोलेशन मधील 75 असे एकूण 92 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण तेल्हारा येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

998 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57356(42939+14240+177) आहे. त्यात 1118 मृत झाले आहेत. तर 55240 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 998  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ