1137 अहवाल प्राप्त, 40 पॉझिटीव्ह, 269 डिस्चार्ज

 


           अकोला,दि.9(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1137 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1097 अहवाल निगेटीव्ह तर 40  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 269  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 33 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56877(42664+14036+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 40 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 33= एकूण पॉझिटीव्ह- 73.

 

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 279907 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 276472 फेरतपासणीचे 394 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3041 नमुने होते. आजपर्यंत एकूण  279815 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 237151 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

40 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 40 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 13 महिला व 27 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापूर-पाच, बार्शीटाकळी-एक, पातूर-एक, बाळापूर-पाच, तेल्हारा-तीन, अकोला-25. (अकोला ग्रामीण-सात, अकोला मनपा क्षेत्र-18), दरम्यान काल (दि.8) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 33  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

269 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17, आयुवेदिक महाविद्यालय येथील एक, हार्मोणी हॉस्पीटल येथील एक, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 240 असे एकूण 269 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

2127 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56877(42664+14036+177) आहे. त्यात 1105 मृत झाले आहेत. तर 53645 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2127 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ