दक्षतेचा इशारा

 


अकोला,दि.7(जिमाका)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार (दि. 11) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये विज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी. सर्व नागरीकांनी विज, पाऊस यापासुन स्वत:चे व आपलया पशुधनाचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी.   या कालावधीत नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी पुढील दक्षता घ्यावी.

वीजेपासुन बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रम घ्यावा, विज व वादळापुर्वी संगणक, टेलीव्हीजन इ. विद्युत उपकरणे बंद करुन स्त्रोतापासुन अलग करुन ठेवावीत. विजा चमकत असतांना मोकळे मैदान, झाडाखाली, विजवाहीनी अथवा ट्रान्सफार्मरजवळ थांबु नये तसेच अशावेळी मोबाईलचा उपयोग करुन नये, पुरस्थितीमध्ये नदीचा पुर पाहण्यासाठी नदीकाठावर जाऊ नये, पुलावरुन पाणी वाहत असतांना पुल ओलांडु नये, पुरस्थितीमध्ये जाण्याचा  व पोहण्याचा प्रयत्न करुन नये, पुर किंवा अतिवृष्टीच्या काळात आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ