पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना; शेतकऱ्यांनी फळपिक विमाचा लाभ घ्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

      अकोला, दि.29(जिमाका)- मृग बहार 2021 मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजना राज्यातील 26 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील  शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

 अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे  शेतकऱ्यांसह कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.  अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंमलबजावणी करिता एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स क. लिमिटेड कंपनी, मुंबईची नेमणूक करण्यात आली आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत समाविष्ट फळपिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा  विमा हप्ता -

.क्र.

फळपिकाचे नाव

विमा संरक्षित रक्कम (रु./ हेक्टर)

शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)

संत्रा

८००००

४०००

लिंबू

७००००

३५००

मोसंबी

८००००

४०००

डाळिंब

१३००००

६५००

पेरू

६००००

३०००

अधिसूचित फळपिके, तालुका व महसूल समाविष्ट मंडळ

.क्र.

अधिसूचित फळपिके

तालुका

महसूल मंडळाचे नाव

डाळिंब

अकोला

शिवणी

पेरू ,मोसंबी

पातुर

पातुर

लिंबू

अकोला, बार्शिटाकली, मुर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, पातुर व बाळापूर

शिवणी, सांगळूद,बोरगावमंजु,कौलखेड, कापशीरोड, राजंदा, धाबा, महान,खेर्डाबु.,निम्भा, जामठी बु., कुरुम, मुर्तिजापूर, हातगाव, अकोलखेड, आसेगाव बाजार,उमरा, पणज, मुंडगाव, अकोट,अडगाव बु., हिवरखेड, माळेगाव बाजार,पातुर, बाभूळगाव,आलेगाव,सस्ती, चान्नी,वाडेगाव, बाळापूर

संत्रा

बार्शिटाकली,मुर्तिजापूर,अकोट, तेल्हारा, पातुर

राजंदा, धाबा, निम्भा, कुरुम, हातगाव, अकोलखेड,  उमरा, पणज,  अकोट, अडगाव बु., हिवरखेड, माळेगाव बाजार,तेल्हारा, पातुर, आलेगाव.

 

शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळण्याकरीता संत्रा, मोसंबी, लिंबू,पेरू या फळ पिकाकरिता बुधवार दि. 30 जुन तर डाळिंब फळपिकाकरीता 14 जुलै 2021 या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीकरिता तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी प्रतिनिधीदूरध्वनी क्रमांक ०२२-६२३४६२३४,  ग्राहक सेवा क्र.-१८००२६६०७००pmfby.maharashtra@hdfcergo.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ