622 अहवाल प्राप्त, सात पॉझिटीव्ह, 35 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू


           अकोला,दि.29(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 622 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 615 अहवाल निगेटीव्ह तर सात  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 35 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57581(43063+14341+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी  दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर सात+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी तीन = एकूण पॉझिटीव्ह-10

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 292482 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 289002  फेरतपासणीचे 397  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3083  नमुने होते. आजपर्यंत एकूण 292430 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 249367 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

सात पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात सात अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-  मुर्तिजापूर-एक, बाळापूर-एक, बार्शीटाकळी-एक, अकोट-एक,अकोला महानगर पालिका क्षेत्र- तीन, दरम्यान काल (दि.28) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

एकाचा मृत्यू

आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली.  त्यात, खदान येथील 35 वर्षीय अज्ञात पुरुष रुग्णास दि. 28 जून रोजी मृतावस्थेत दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

35 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीनगोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील एक, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील दोन, फातेमा हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 25 असे एकूण 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

386   जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या57581(43063+14341+177)  आहे. त्यात 1127  मृत झाले आहेत. तर 56068 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 386  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ