रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 687 चाचण्यात 10 पॉझिटीव्ह

 अकोला,दि.24(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.23) दिवसभरात झालेल्या 687 चाचण्या झाल्या त्यात 10  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोट येथे 43 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे 90 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 55 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला महानगरपालिका येथे 337 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, वैद्यकीय महाविद्यालय येथे 38 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, हेगडेवार लॅब येथे 23 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला येथे एक,  बार्शीटाकळी येथे 13, पातूर येथे 38, तेल्हारा येथे आठ, अकोला आयएमए येथे तीन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 38 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 687 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 79 हजार 782 चाचण्या झाल्या पैकी 14367 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ