बालकामगार विरोधी दिन; जनजागृती सप्ताहाचे आयोजन
अकोला,दि.5(जिमाका)- राष्ट्रीय
बाल हक्क संरक्षण
आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 12 जून जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिवस म्हणून
सर्व जगात पाळण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधुन सहाय्यक कामगार
आयुक्त, अकोला जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण व तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी यांचे
संयुक्त विद्यमाने बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे आयोजन केले आहे.
सप्ताहाचे शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांचे हस्ते सोमवार दि. 07 जुन रोजी सकाळी 11:30 वाजता होणार आहे.
सप्ताहात विविध
कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले असुन विविध आस्थापनांमध्ये बालकामगार ठेवण्यात येऊ नये यासाठी
आस्थापना मालकांकडुन
बालकामगार कामावर ठेवणार नाही, असे हमी पत्र लिहुन घेण्यात येणार
आहे. तसेच विविध जनजागृती
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पोस्टर
कॉम्पीटीशन, कलाकारांच्या
नजरेतुन बालकामगार अशा विविध कार्याक्रमांसह प्रशासकिय अधिकारी आणि एनजीओ यांच्या
समवेत कोविड-19
चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले
आहे.
कार्यक्रमाची वेबलिंक प्राप्त
करण्यासाठी 8605095744
अथवा
7020410908 या क्रमांकावर संपर्क साधावा. बालकामगार (काम
करणारी मुले) या
विषयावर ‘पोस्टर विथ स्लोगन’ स्पर्धेत
14 वर्षाखालील, 15 ते 25 वर्ष व खुलागट अशा तिन
वयोगटांमध्ये आयोजीत करण्यात आली असुन कलाकृती दि. 10 जुन पुर्वी 9922817585 अथवा 9272485459 या वॉट्सॲप
मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील
दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था, कारखाने व
औद्योगीक आस्थापना मालकांनी, बाल कामगार
कामावर ठेऊ नये,
असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राजु दे. गुल्हाने यांनी केले आहे.
0000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा